deepali arc foundation's student's experiences

MRS. SARIKA RANE


नमस्कार
मी सारिका राणे, आज तुम्हाला रेकी चा एक खूपच भारी अनुभव सांगते खरंतर थोडा उशीरच झालाय पण जो पर्यंत गुरुमाऊली भेटून त्यांचा आशीर्वाद घेत नाही तोपर्यंत अनुभव share करू नये असं वाटतं होत..
दिपाली मॅडम तुम्ही आमच्या आयुष्यात तुमची रेकी आणि angel ची जादूची छडी घेऊन आलात आणि आयुष्याला अनपेक्षित वळण मिळालं.
तर झालं असं की आम्ही 11 वर्षांपूर्वीच पुण्याला माझं सासर असल्यामुळे तिथे त्यांच्याजवळ घर घेतलेलं आणि इच्छा होती तिथे permanent shift व्हायचं पण बरंच try करूनही तेंव्हा मिस्टरांच्या जॉबचं होत नव्हतं म्हणून आम्ही नाईलाजाने ठाण्याला राहिलो कारण जॉब. पण तिथे आम्ही rent ने घर घेऊन राहत होतो आणि सतत मनात एकच सल स्वतःच घर असताना आम्ही rent ने राहतोय..

पण दीड वर्षांपूर्वी मी मॅडम कडे रेकी शिकले आणि खूप धमाल अनुभव यायला लागले.. माझे अनुभव बघून माझे मिस्टर सुद्धा रेकी शिकले... आणि मग आमची इतक्या वर्षांची इच्छा पुन्हा डोकं वर काढायला लागली पुण्याला शिफ्ट व्हायचंय... मग काय आम्ही दोघंही ह्या इच्छेसाठी रेकी द्यायला लागलो कारण हे तेंव्हाच शक्य होत जेव्हा मिस्टरांना तिथे जॉब मिळेल आणि इथे आम्हाला Angels नी खूप मदत केली कंपनी सिलेक्ट करायला, मुलगी 5th ला असल्यामुळे तिच्यासाठी योग्य शाळा सिलेक्ट करायला आणि हे सगळं व्यवस्थित पार पाडण्यासाठी योग्य संकल्प तयार करायला... आणि आम्ही रेकी द्यायला सुरवात केली...सुरवातीला काहीच घडत नव्हतं कधी कधी वाटायचं किती वेळ अजून... पण रेकी शक्ती वर Angels वर आणि specially आपल्या मॅडम वर पूर्ण विश्वास होता आणि रोज रेकी देता देता अचानक घटना घडायला लागल्या.. मिस्टरांना पुण्यात त्याच कंपनीत त्याच पोस्ट ला जॉब मिळाला ज्याच्यासाठी रेकी देतं होतो,.. मुलीला मनासारखी शाळा मिळाली आणि 1st may ला आम्ही finally आमच्या स्वतःच्या घरात राहायला सुरवात केली.
आम्ही इतकंच सांगू तुम्हाला रेकी शक्ती आपल्याला योग्य वेळी आणि योग्य ते भरभरून देते.. संकट सुद्धा येतात पण विश्वास डळमळू देऊ नकात
आपल्याला दिपाली मॅडम नी खूप काही शिकवलंय strong बनवलंय..आणि त्या फक्त course पुरतं नाही शिकवत तर त्या सतत आपल्याला मेडिटेशन च्या माध्यमातून काही ना काही देतं असतात तेही आपण न मागता कारण गुरूला न सांगताच कळत आपल्या शिष्याला काय हवय...
आपण सगळे खूप नशीबवान आहोत आपल्या कडे दिपाली मॅडम आहेत...
Thank u mam
Thanks a lot from bottom of our heart
असेच अजून खूप छोटे छोटे अनुभव आहेत आणि खरंच प्रत्यक्ष भेटायची खूप इच्छा होती...आणि त्या भेटीतला अनुभव पण खूप छान होता.. मनात त्या गुरु स्थळी जाऊन मनात एक problem cha विचार अनाहूत आला आणि स्वामींनी गुरुमाऊली च्या हातून त्याचा उपाय म्हणून न मागता एक गिफ्ट मिळालं....खरंच असे गुरु मिळाल्या आम्हाला, आम्ही नशीबवान आहोत श्री स्वामी समर्थ
हे इथेच थांबणार नाही पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्तो ..

सारिका भूषण आणि श्रीया राणे हा माझा review आहे आपल्या DARC Foundation च्या apps बद्दल...
Deepali Mam नी केलंय म्हणजे नक्कीच काहीतरी special असणार म्हणून मी कालच हा app डाउनलोड करून घेतला त्यात mam नी Changing Pattern of Failure च meditation upload केलंय ते मी purchase केलं आणि लगेच मेडिटेशन करायला ही बसले. खूपच छान अनुभव होता तो आणि तितकंच महत्वाचं आहे की एकदा purchase केल्यावर हे मेडिटेशन पूर्ण महिना मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघं ही कितीही वेळा करू शकतो.
So its a big opportunity to all of us
लवकरात लवकर हा app डाउनलोड करा आणि हे मेडिटेशन करायला सुरवात करा. तुमची अडलेली काम मार्गी लावा आणि तुमचे अनुभव सुद्धा share करा

Mrs. Mugdha Paranjape

AngelTherapy नमस्कार, मी मुग्धा परांजपे,

मी दीपाली मॅडमकडे Angel Therapy (Basic & Advance ) चा कोर्स केला. जेव्हापासून मला या कोर्सबद्दल समजले तेंव्हापासून हा कोर्स करायला मी उत्सुक होते की हे Angels म्हणजे नक्की काय असतं, कसं असतं.. क्लास सुरू झाल्यानंतर खरंच सांगते इतके जबरदस्त अनुभव आले मला Angels चे. माझी चिडचीड कमी झाली. Intuitions वाढायला लागले. एकदा का तुम्ही Angels शी connect झालात की अगदी छोट्यातली छोट्या गोष्टींसाठी तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता. फक्त तुमचा त्यांच्यावर अतिशय दृढ विश्वास पाहिजे.
उदाहरण द्यायचं झालं तर Archangel Chamuel आहेत त्यांना माझ्या हरवलेल्या गोष्टी सापडून देण्याबद्दल सांगितलं आणि पुढच्या थोड्याच वेळात मला त्या गोष्टी सापडल्या.(तसे intuition मिळाले की त्या गोष्टी कुठे असतील)
आपल्या Guardian Angel ना तर आपण आपल्या मनातलं अगदी काहीही सांगू शकतो आणि ते आपल्याला मदत करतात. हा कोर्स करण्यासाठी Angel Cards घ्यावी लागतात ती cards Amazon, Flipkart वर ₹१५०० ते ₹१७००/- किंवा त्यापेक्षाही जास्त किमतीला आहेत. मी माझ्या Guardian Angel ना सांगितलं की मला ही cards ₹१००० ते ₹११००/- ला मिळू देत. मी रोज वेगवेगळ्या साईट्स वर लक्ष ठेऊन होते आणि एक दिवस अचानक कधीही न बघितलेली साईट मला मिळाली & you don't believe तिथे ही cards ₹११६३/- ला होती आणि पहिल्यांदा विकत घेत होते म्हणून मला १०० रुपये ऑफ मिळाले आणि मला total ₹१०६३/- ही कार्ड्स मिळाली. (सोबत फोटो जोडत आहे). थोडा उशीर झाला मला ही cards मिळायला पण मिळाली आणि मला हव्या असणाऱ्या किंमती मध्ये. आत्ता हा review लिहीत असताना मी त्या साईट वर जाऊन बघितले तर तिथे आता ही कार्ड्स unavailable आहेत.

मी तर माझ्या घरातल्या व्यक्तींनी माझ्याशी कसं वागावं हे पण माझ्या Guardian Angel ना सांगितलं आणि लगेचच त्याप्रमाणे घडायला लागलं.
आमच्या Angels च्या group मध्ये एक दोघींना Angels ची पिसं मिळाली ते मी माझ्या मिस्टरांना सांगितले पण त्यांनी यावरून माझी मस्करी केली पण नंतर जेंव्हा मी त्यांना Angel healing दिले तेंव्हा त्यांनी मान्य केलं की काहीतरी शक्ती आहे. ती शक्ती आजूबाजूला असली की एकदम रिलॅक्स आणि पॉझिटिव्ह वाटतं.

याबरोबरच मॅडम या कोर्स मध्ये जी काही meditations घेतात त्यांचा खूप जबरदस्त अनुभव आला.. खूप negativity बाहेर पडायला लागली. Card reading सुद्धा मॅडम या कोर्स मध्ये शिकवतात त्याचा सुद्धा भन्नाट अनुभव आला. Card reading करायला खूप मजा आली आणि एकदम परफेक्ट उत्तरं आपल्याला Angels कडून मिळतात.
हा review लिहिण्यासाठी सुद्धा मी Archangel Gabriel ची मदत घेतली आहे. मला खूप काही सांगायचं असतं पण ते नीट शब्दात मांडायला येत नाही म्हणून Archangel Gabriel ला बोलावले आणि सांगितले मला review लिहायला मदत कर. आणि तो वाचून तुम्हाला कळलंच असेल तिने किती छान मदत केली आहे ते.. असे भरपूर अनुभव मला आले अजूनही येतात पण सगळे लिहीत बसले तर खूप मोठा लेख होईल. तुम्ही खरोखर त्यांच्यावर विश्वास ठेवा ते नक्की मदत करतात म्हणजे करतातच.. ज्यांनी हा कोर्स केलेला नाही त्यांनी खरंच करा आणि तुम्ही अद्वितीय, जादुई अशा Angels च्या दूनियेशी जोडले जाल.. Thank you Thank you Thank you Deepali Madam and Thank You Angels... I love you both
Meditation - Changing Pattern Of Failure मी मुग्धा परांजपे, मी दीपाली मॅडमकडे Changing Pattern Of Failure Meditation केलं. खूप छान अनुभव आला. हे Meditation मी माझ्या करिअर साठी केलेलं. मॅडमच्या सूचनेप्रमाणे भूतकाळात जाऊन एक एक घटना Delet करत गेले. ज्या ज्या व्यक्तींनी चुकीचा सल्ला दिला त्यांना माझ्या आयुष्यातून Delet केलं. हे सगळं करत असताना एक प्रकारचा राग, दुःख जाणवत होतं. श्वास लागल्यासारखे वाटत होते. जस जसं मी एकेक घटना Delet करत गेले तस तसे श्वास नॉर्मल व्हायला लागले. आणि एकदम हलकं वाटायला लागलं. अजून एक अनुभव असा आला की माझी मॅडमकडे Angel Therapy झाली तर हे Meditation करत असताना मला माझे Gaurdian Angel माझ्या शेजारी येऊन बसलेले दिसले.. हा खूपच सुंदर आणि न विसरता येणारा अनुभव होता.. सगळ्यांनी अशाप्रकारची Meditations जरूर करायला हवीत. हे Meditation मी एकदा करून मला इतका अनुभव आला तर ॲपमधून विकत घेऊन पूर्ण महिनाभर हे Meditation केले तर त्याचा किती फायदा होईल याचा सगळ्यांनी जरूर विचार करावा. मी सुद्धा ॲपमधुन परत हे Meditation नक्की करणार आहे. मॅडम तुमचे खूप खूप आभार.. ​

Mr. prerana patil

Angeltherapy मी प्रेरणा ,
मी दिपाली मॅम कडे angels चा कोर्स केला हा खूप life changing experience आहे ,class करण्याआधी मी खूपdepression मध्ये होते. जॉब मधे problem ,सतत येणारे failure ,सारखी चिडचिड. एकदम de motivated, आता पुढे काही होऊ शकत नाही किंवा करू शकत नाही अशी भावना.
क्लास ला admission मी एकदम last moment ला घेतलं, अगदी क्लास सुरु होण्याच्या २ तास आधी . and after that my life started to change .
काही अनुभव share karte ,सगळे तर message मध्ये नाही सांगू शकत पण तरी काही share करते
१. पहिला अनुभव म्हणजे ,मी जिथे राहते ते अगदी छोटे गाव आहे ,तिथे ऍमेझॉनचे पार्सल्स डिलिव्हरी होत नाहीत ,पण मला angel कार्ड्स ऑर्डर करायचे होते. चेक केलं तर ते non deliverable दाखवत होते . क्लास सुरु होऊन फक्त ४ दिवस झालेले. अँजेल्स ला फक्त एकदाच सांगितलं आणि after १५ mins only . तिथे deliverable दाखवायला लागला .
२. माझ्या जॉब च काही खरा दिसत नव्हत काय करावं ते हि सुचत नव्हतं ,पण क्लास सुरु झाल्यापासुन confidence वाढलेला, टेन्शन घेणं सोडलेल, कारण with angels अँड mam automatically we start to feel confident, secure. आणि सतत interview मध्ये आधी failure येत होतं. class नंतर १ week मध्ये माझ्या dream company मध्ये selection झालं . आणि ज्या कंपनीत offer letter यायला १ month लागतो तिथे माझं ऑफर लेटर १ week मधे आले .
३. क्लास चालू असतानाच अचानक कॉल आलेला माझ्या husband चे खूप जवळचे friend घर सोडून गेलाय आणि तो आयुष्य संपवायच्या गोष्टी करत होता. आम्ही पण गेलेलो त्याला शोधायला मी अँजेल्स ला सांगितलं आणि मी लोकेशन ट्रॅक करून त्या लोकेशन ला पोहोचले आणि लगेच कॉल आला कि तो रेल्वे ट्रॅक वर सापडला .
४. माझे एक काका जे कि ५ years पासून बोलत नव्हते ,त्यांच्याशी रेलेशन्स पाहिल्यासारखे आहेत आता.

खूप खूप अनुभव आहेत सगळं इथे नाही लिहता येणार. message अजून मोठा झाला असता
माझी चिडचिड खूप कमी झालीये ,मी आधी खूप शांत होते जास्त बोलत नव्हते ,पण आता खूप change झालाय . क्लास चालू असताना मनात काही प्रॉब्लेम्स असतील तर every time mam ला सांगितलेल नसताना, mam solution सांगायच्या, खूप विशेष वाटतं mam every student ला मनापासून घरच्यासारखा guide करतात . fees काहीच घेत नाहीत mam. असच feeling आहे after completing कोर्से . ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी हा Angels चा course नक्की करा .
Angels ची batch खूपच मस्त होती ,I found my angels .Mam, Mugdha, Aishwarya सारख्या angels मिळाल्या .
I am so lucky that I found my guru angel deepali mam .
Trust mam blindly, then you will never look back .

Thank You So Much

Aishwarya zade

नमस्कार, मी ऐश्वर्या २० मे २०२२ पासून मी आपल्या दिपाली जन्नु मॅडम कडे Angel healing चा कोर्स केला. अतिशय सुंदर अनुभव मला हा कोर्स करताना आले. विशेष म्हणजे स्वतःमध्ये खूप सकारात्मक बदल मी अनुभवले आणि आजही ते अनुभवत आहे. हा कोर्स करण्याआधी मी खूप डिप्रेशनमध्ये होते. Depression मध्ये असल्यामुळे मला काम करायची इच्छा होत नव्हती, सतत चिंता असायची माझ्या मनात, कोणत्याच गोष्टीमध्ये स्थिरता नव्हती (भावनिक, मानसिक, शारीरिक, आर्थिक), खूप उदास वाटायचे मला. मी कितीही ठरवले की आनंदी राहायचे तरी देखील ते मी करू शकत नव्हते. जेंव्हा पासून हा कोर्स मी करायला सुरुवात केली त्यानंतर मला एक वेगळी एनर्जी माझ्या आजूबाजूला आहे असे जाणवते आणि ते मी डोळ्यांनी बघू शकत नाही पण मला ती एनर्जी स्पष्ट सांगायचे तर Angels सतत माझ्या सोबत असतात हे जाणवते मला. आणि हा अनुभव मी इथे शब्दात व्यक्त नाही करू शकत. कोर्स मध्ये जे meditation केले त्यानंतर खूप सकारात्मक वाटते मला. मनापासून आनंदी राहते मी . कोणत्याही परिस्थितीत मी आता positive असते. कोणत्याही गोष्टीची चिंता सतावत नाही मला. खूप भारी अनुभव आहे ह्या सगळ्या गोष्टींचा. आपल्या ग्रुप मध्ये जर कोणी हा कोर्स केला नसेल तर मी त्यांना आवर्जून सांगेन की हा कोर्स please तुम्ही करा. तुमच्या आयुष्यात काही problem असो वा नसो. खूप छान बदल अनुभवायला मिळतात. आणि Angels मुळे प्रेरणा ताई आणि मुग्धा ताई ह्या दोन खूप छान मैत्रीणी मिळाल्या. मैत्रीणी म्हणण्यापेक्षा त्या दोघी देखील Angels आहेत माझ्या आयुष्यात. दिपाली मॅम चे खूप मनापासून आभार मानते कारण त्यांच्या मुळे मला ह्या कोर्स बद्दल कळले आणि त्यांनी खूप छान मार्गदर्शन देखील केले. Thank you soooooo much mam.. I love you a lot Thank you so much my all sweet and lovely angels (including Deepali mam, Prerna tai and Mugdha tai) I love you soooooo much