घरात शांतता राहण्यासाठी

माझ्या बऱ्याच क्लायंट्स कडून मला अनेकदा सुचवले जाते कि, त्याना डेली लाईफ साठी काहीतरी उपाय सांगावेत . असे उपाय कि, ज्यांचा वापर करून आपले रोजचे जीवन नक्कीच सकारात्मक होईल. त्यामुळे यावर विचार करून आज पासून काही उपाय इथे देणार आहे. जमेल तसे, जमेल तेव्हा इतर ब्लॉग्स च्या मध्ये मध्ये असे उपाय देत राहीन. जरूर वाचा. आणि उपाय करून पहा. काय अनुभव येतो तो मला सांगायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला अजून असे काही उपाय द्यायचे कि नाही ते ही ठरवायला.
कारण जसे टाळी एका हाताने वाजत नाही, तसेच हे ही आहे. मी नुसतेच उपाय देऊन उपयोग नाही. तुम्ही ते केले, अमलात आणले आणि त्यातून तुम्हाला फायदा झाला तरच माझ्या या उपाय देण्याचा फायदा आहे. बरोबर ना !!
आणि हो कोणताही उपाय आज केला आणि फायदा झाला असे होत नाही. ‘ पी हळद आणि हो गोरी ’ हे एका रात्रीत शक्य नाही. तसेच आहे हे पण, या प्रत्येक उपायाला किमान २१ दिवस किंवा ४५ दिवस देऊन त्याचा प्रत्यय घ्यावा. प्रत्येकाला त्यांच्या कार्माभोगानुसार प्रत्येक उपायाचा असर व्हायला वेळ लागतो.
चला तर मग आज सुरुवात करू या ती आपल्या घरातूनच. घरातले वातावरण जर चांगले असेल तर माणूस समाधानाने घरातून बाहेर पडतो कामासाठी. अन्यथा सतत त्या गोष्टीचा मानसिक त्रास होत राहतो. आणि मग संपूर्ण दिवस खराब जातो.
घरामध्ये जर वातावरण बिघडत असेल, विनाकारण घरात वाद होत असतील, सगळ्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशांना रहात असतील, अशा वेळी घरातल्या कोणालाच दोष देण्यासारख नसते. प्रत्येक जण आपापल्या परीने योग्यच असतो असे त्याना वाटत असते, किंवा असेल ही तसे. पण त्यामुळे होते काय कि, अशावेळी माघार कोण घेणार ? या नादात घरातले वातावरण आणखीनच बिघडत जाते.
असो, कशीही परिस्थिती असू देत, घरात शांतता राहण्यासाठी
पुढील मंत्र रोज १०८ वेळा म्हणजे १ माळ जप करावा.
|| ओम श्रीं शं सं षं ओम ||
हा जप घरात कोणीही केला तरी चालेल. अगदी सगळ्यांना शक्य असेल त्यांनी म्हंटला तरी चालेल. लवकरच उत्तम अनुभव येईल.
अनुभव सांगायला विसरू नका हं !!